Vikasnagar News : शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी व्हावी- प्रा. बाळासाहेब धावारे

0

एमपीसीन्यूज : छत्रपती शिवाजी महाराज यांची संपूर्ण जगात ख्याती असून त्यांना फार मोठा मानही आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या जन्म तारख्या या वेगवेगळ्या नसाव्यात. शासनाने 19 फेब्रुवारी हीच त्यांची जन्म तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे याच तारखेला शिवजयंती साजरी व्हावी. शासनाने शिवाजी महाराज यांचा जयंती सप्ताह साजरा करून त्यांचे विचार, आचार , सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावेत, असे प्रतिपादन प्रा. बाळासाहेब धावारे यांनी केले.

_MPC_DIR_MPU_II

शाहू फुले आंबेडकर विचार मंचच्या वतीने विकासनगर-किवळे येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे व माजी नगरसेवक बाळासाहेब तरस यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी उपस्थित शिवप्रेमी नागरिकांना मार्गदर्शन करताना प्रा. धावारे बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व मंचचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, माजी सरपंच सुदामराव तरस, शिवसेना उपशहरप्रमुख नवनाथ तरस, युवा नेते राजेंद्र तरस, राष्ट्रवादीचे यदुनाथ डाखोरे, तुषार तरस, राजू येवते, बापूसाहेब गायकवाड, हनुमंत राऊत, अनिल सोनवणे, मेघराज तंतरपाळे, दादाभाऊ ओव्हाळ, रमाई व एकता महिला बचत गटाच्या सिंधू तंतरपाळे, निर्मला चव्हाण, सीमा तंतरपाळे, मीनाक्षी वाघमारे, सरिता सोनावणे आदींसह जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment