Vikasnagar Vaccination News : विकासनगर येथे लसीकरण केंद्र सुरू करा ; युवा सेनेची मागणी

एमपीसीन्यूज : महापालिका प्रभाग क्र. 16 किवळे येथील विकासनगर, किवळे, बापदेवनगर, एम. बी. कॉम्प, आदर्शनगर, भिमाशंकरनगर, श्रीनगर, दत्तनगर, भारतरत्न सोसायटी या परिसराची लोकसंख्या जास्त असल्यामुळे विकासनगर किवळे येथील महापालिका प्राथमिक शाळा क्र. 95 येथे लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी युवा सेना आणि फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत युवा सेना उपशहर अधिकारी राजेंद्र तरस यांच्या पुढाकाराने शिवसेना शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना निवेदन देण्यात आले आहे.

शिवसेना उपशहरप्रमुख नवनाथ तरस, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, चिंचवड विधानसभा उपअधिकारी संतोष पवार, उपशहर अधिकारी पंकज दीक्षित आदी उपस्थित होते.

सध्या किवळेगाव येथे लसीकरण केंद्र आहे. परंतु, हे केंद्र विकासनगर व परिसरापासून दोन किलो मीटर लांब आहे. शिवाय तेथे प्रचंड गर्दी होते. त्यामुळे विकासनगर येथे कोराना लसीकरण केंद्र सुरु करून नागरिकांना होणार त्रास कमी करावा,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.