Lonavala : मतदाराला केंद्रबिंदू मानून मतदार साक्षरता अभियान – सुभाष भ‍ागडे

एमपीसी न्यूज – लोकशाहीत मतदान हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकारी आहे. ज्यांचे वय अठरा पूर्ण झाले आहे, अशी कोणतीही व्यक्ती मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये. याकरिता मतदाराला केंद्रबिंदू मानत निवडणूक आयोगाने मतदार साक्षरता अभियान सुरु केले असल्याची माहिती मावळचे प्रांत अधिकारी सुभाष भागडे यांनी दिली.

मावळ विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या मतदार साक्षरता अभियानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्याकरिता प्रांत अधिकारी लोणावळा महाविद्यालयात आले होते. यावेळी महाविद्यालयात सुरु असलेल्या मतदार साक्षरता क्लबच्या नामफलकाचे अनावरण देखील करण्यात आले.

लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव दत्तात्रय पाळेकर, लोणावळा मंडल अधिकारी बजरंग मेकाले, प्राचार्य डाॅ.एन.बी.पवार, उपप्राचार्य डाॅ. जे.ओ.बच्छाव, वलवण विभागाचे तलाठी संतोष राणे, मह‍विद्यालयाचे नोडल अधिकारी डाॅ. निलेश काळे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी हितगूज साधताना सुभाष भागडे म्हणाले प्रत्येक सज्ञान व्यक्तीने आपला मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे. निकोप लोकशाहीत सुदृढ समाज घडविणारा प्रतिनिधी निवडून देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याकरिता मतदान हे निपक्ष व निर्भयपणे व्हायला हवे. 1 जानेवारी 2019 पर्यंत वयाची अठरा वर्ष पूर्ण होणार्‍या सर्वांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी. 31 आॅक्टोबर 2018 पर्यंत मतदार यादीत न‍ावनोंदणी असणार्‍या मतदारालाच येणार्‍या लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार असल्याने प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत आहे का याची खात्री करुन घ्या. तसेच नवीन मतदारांनी आपली नाव नोंदणी करुन घ्यावी.

लोणावळा शहर व मंडल भागात 52 बीएलओ नाव नोंदणीचे काम करत आहेत. त्यांच्याकडे नवीन नाव नोंदणी करणे, मयत व्यक्तीचे नाव कमी करणे, मतदानाचे ठिकाण बदलणे याकरिता वेगवेगळ्या नमुन्यातील अर्ज आहेत ते भरुन द्यावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

राज्य निवडणूक आयोगाने मतदान साक्षरता क्लब चार भागात विभागाला असून यामध्ये महाविद्यालय स्तरावर नवीन मतदार शोधत नोंद करणे, शाळा स्तरावर भविष्यात तयार होणार्‍या मतदारांना मार्गदर्शन करणे, कामानिमित्त गावोगावी फिरणार्‍या व वंचित व्यक्तीचा शोध घेऊन त्यांची नावनोंद करण्यासाठी चुनाव पाठशाळा व शासकीय कार्यालयांमध्ये मतदार जनजागृती फोरम तयार करण्यात आले आहे.

मतदार न‍ाव नोंदणी अभियानाला राष्ट्रीय कर्तव्य मानत महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक काम करतील, असे आश्वासन यावेळी संस्थेच्या वतीने दत्तात्रय पाळेकर यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.