Wagholi : ऑनलाईन टास्कद्वारे पैसे कमावण्याचे आमिष दाखवत 18 लाख 42 हजार रुपायांची फसवणूक

एमपीसी न्यूज –   59 वर्षीय व्यक्तीला टेलिग्राम ॲपवर मेसेज करून ( Wagholi ) ऑनलाईन टास्क द्वारे पैसे कमावण्याचे आमिष दाखवत सुमारे 18  लाख 42 हजार रुपायांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना वाघोली  येथील आय व्ही इस्टेट येथे घडली . याप्रकरणी अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या टेलिग्राम ॲपवर वर्क फ्रॉम होम जॉब बाबत मेसेज करून ऑनलाईन हॉटेलला लाईक व रिव्यू देण्याचे टास्क द्वारे पैसे कमविण्याचे आमिष दाखविण्यात आले. सुरुवातीला त्यांनी 27 हजार रुपये जमा केल्यानंत 48  हजार रुपये टास्कचा परतावा मिळाला.

परताव्याचा विश्वास बसल्यानंतर त्यांनी वेळोवेळी 18 लाख 90 हजार भरले. पैसे भरल्यानंतरही परतावा मिळत नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिसात तक्रारी अर्ज दिल्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला ( Wagholi ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.