Wakad Crime : विवाहितेची छेड काढत पतीला व मुलांना मारून टाकण्याची धमकी देणारा अटकेत

एमपीसी न्यूज – फोन करून, पाठलाग करून (Wakad Crime) तसेच रस्त्यात अडवून विवाहितेची छेड काढणाऱ्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 13 फेब्रुवारी 2022 ते 29 डिसेंबर 2022 या कालावधीत थेरगाव येथे घडला. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी क्रांतिलाल रामा वराळेला (वय 28 रा.थेरगाव) अटक केली आहे. 

Vikasnagar News: विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी; चष्मे, कंपास बॉक्सचे वाटप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाईलवर (Wakad Crime) फोन करून तू मला आवडते म्हणत ओळख वाढविण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांना सतत फोन करून पाठलाग करून फिर्यादी यांच्यावर पाळत ठेवली. फिर्यादीची इच्छा नसतानाही ओळख वाढवली, याच ओळखीचा गैरफायदा घेत माझ्याशी लग्न कर अशी आरोपीने मागणी करत फिर्यादीचा हात व ओढणी पकडून गैरवर्तन केले. याप्रकरणी पोलिसात तक्रार केली तर तुला, तुझ्या पतील व मुलाला ठाऱ मारून टाकेन अशी धमकी दिली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.