Wakad Crime News : सोशल मीडियावर बनावट अकाउंट बनवून महिलेचा पाठलाग
एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर महिलेच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून त्याद्वारे महिलेचा पाठलाग केला. याबाबत एकाच्या विरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2015 ते पाच जुलै 2021 या कालावधीत घडला.
सतबीर पृथ्वीराम सिंग (रा. सिवन, ता. व जि. कैथल, हरियाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने cत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतबीर याने फिर्यादी महिलेच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. त्या अकाउंटद्वारे महिलेचा पाठलाग केला. तसेच आरोपीने पीडित महिलेच्या मोबाईल फोनवर वारंवार फोन, मेसेज केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वाकड पोलीस तपास करीत आहेत.