-MPC-TOP-MOST-BANNER-I

Wakad Crime News : विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – विवाहिता एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तिला व तिच्या मुलाचा सांभाळ करण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी गुपचूप विवाह केला. विवाहानंतर पती आणि सासरच्या मंडळींनी विवाहितेचा विविध कारणांवरून छळ केला. याबाबत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार सन 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत डांगे चौक थेरगाव येथे घडला.

प्रणव अरुण वायकर (वय 28), अरुण वायकर (दोघे रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर), पुनम अरगळे, निलेश अरगळे (दोघे रा. पनवेल), संजय आवटे (रा. घाटकोपर, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 30 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 14) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रणव याने फिर्यादी विवाहित महिला एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन ‘तुझा व तुझ्या मुलांचा सांभाळ करतो’, असे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी गुपचुप लग्न केले. फिर्यादी यांनी लग्नाचे फोटो आरोपीच्या नातेवाईकांना पाठवल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच फिर्यादी यांचे सासरे यांना फिर्यादी यांनी याबाबत सांगितले. त्यावेळी त्यांनी देखील हे लग्न मान्य नसल्याचे सांगून फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांना त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn