Wakad Crime News : दुचाकीस्वाराचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरला; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून चाललेल्या एकाला रस्त्यात अडवून तीन अनोळखी चोरट्यांनी दुचाकीस्वाराच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 3) रात्री अकरा वाजताच्या सुमारास थेरगाव येथे घडली.

संतोष बबन दुधाने (वय 41, सध्या रा. आनंद पार्क, रॉयल कोर्ट बिल्डिंग, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक व्यवसायिक असलेले दुधाने शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास किवळे-रावेत बीआरटी रोडने घरी जात होते. ते सोनाई मंगल कार्यालयाजवळ आले असता दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला गाडी आडवी घातली. त्यानंतर एकाने त्यांच्याजवळ येऊन खिशातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर तीन चोरटे दुचाकीवरून पळून गेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.