Wakad : मावळ मधून पहाटेच शहरात यायचे अन चोरी करून परत जायचे

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांनी एक महिला आणि तिच्या साथीदाराला मोबाईल (Wakad)चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. हे दोघेजण वडगाव मावळ येथे राहत असून पहाटेच्या लोकलने पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात जाऊन अवघ्या काही तासांत चोरी करून परत घर गाठायचे. त्यांच्याकडून 17 लाखांचे तब्बल 35 महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

कन्हैयालाल चेलाराम नटमारवाडी (वय 20) आणि त्याचीं मामेबहिण (दोघेही रा. वडगाव मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Chinchwad :साहित्यिकांनी जबाबदारीने लिहावे – गिरीश प्रभुणे

पिंपरी-चिंचवड शहरात सकाळच्या वेळी उघड्या दरवाजावाटे(Wakad)घरातून मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना वाढू लागल्याने वरिष्ठांनी सकाळच्या वेळेत गस्त वाढवण्याच्या पोलिसांना सूचना दिल्या. त्यानुसार वाकड पोलिसांनी अशा घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक तरुण आणि एक तरुणी संशयितपणे वावरताना आढळले.

दरम्यान, गस्त घालत असताना पोलीस नाईक प्रशांत गिलबिले यांना माहिती मिळाली की, ताथवडे येथील बालाजी लॉ कालेज जवळ एकजण येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी कन्हैयालाल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दोन मोबाईल फोन आढळून आले. तसेच त्याच्या साथीदार महिलेची माहिती घेत पोलिसांनी कन्हैयालाल याच्या मामेबहिणीला देखील ताब्यात घेतले. तिच्याकडेही सुरुवातीला दोन मोबाईल मिळाले.

पोलिसांनी दोघांकडे चौकशी करत एकूण 35 महागडे मोबाईल फोन जप्त केले. हे दोघेही वडगाव मावळ येथे राहत होते. तिथून ते पहाटेच्या लोकलने शहरात येत असत. घरांची रेकी करून घर उघडे दिसताच आत जाऊन मोबाईल फोन चोरून नेत असत. दोघेही मूळचे गुजरात येथील आहेत. इथे चोरलेले मोबाईल फोन तिकडे विक्री करण्याचा दोघांचा कट होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांचा कट उधळून लावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.