Wakad : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 12 लाखांची दारू जप्त

एमपीसी न्यूज – राज्य उत्पादन शुल्कच्या ई विभागाने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रात गोवा बनावट दारू विकण्यासाठी आलेल्या टेम्पोमधून तब्बल 11 लाख 94 हजार 600 रुपयांचे दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई आज, मंगळवारी (दि. 12) कोकणे चौक, रहाटणी येथे करण्यात आली.

नागेश मारुती सावंत (वय 29, रा. भूमकर चौक, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाकड ते नाशिक फाटा या मार्गावरून एक टेम्पो गोवा बनावटीचे विदेशी मद्य घेऊन जाणार असल्याची माहिती पिंपरी विभागाला मिळाली. त्यानुसार, रहाटणी येथील कोकणे चौकात मंगळवारी पहाटे सापळा रचून एका संशयित टेम्पोला थांबवून चौकशी केली असता टेम्पोमध्ये विदेशी मद्याचे 11 लाख 94 हजार 600 रुपये किमतीचे 139 बॉक्स आढळून आले.

आढळून आलेली दारू महाराष्ट्र राज्यात मोठ्या किमतीत विकली जाते. गोवा राज्यातून स्वस्त दरात खरेदी करून महाराष्ट्रात जास्त किमतीला विकून पैसे कमावण्यासाठी ही दारू आणल्याचे निष्पन्न झाले आहे. या मद्यामुळे शासनाचा महसूल चुकवला जातो. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही दारू आणल्याचे समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.