Pune : नगरसेवकांच्या गोंधळामुळे प्रशासनाचा खुलासा समजलाच नाही

एमपीसी न्यूज – सोमवारी झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत काँगेस- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शहरातील प्रश्न सोडविण्यात यावे, यासाठी घंटानाद आंदोलन केले. या गोंधळात अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रशासनाच्या वतीने केलेला खुलासा समजू शकला नाही.

सोमवारी झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत काँगेस- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शहरातील प्रश्न सोडविण्यात यावे, यासाठी घंटानाद आंदोलन केले. राष्ट्रवादीचे नगरसेवक भैय्या जाधव आणि योगेश ससाणे यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध म्हणून भर सभागृहात झोपून निषेध केला. त्यामुळे या लक्षवेधी आंदोलनाकडे सभागृहाचे लक्ष वेधले गेले.

यावेळी केवळ विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनाच बोलू दिल्याने काँगेस, शिवसेना, मनसेने जोरदार हरकत घेतली. त्याला महापौर मुक्ता टिळक यांनी काहीही दाद दिली नाही. या गोंधळातच अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांना खुलासा करण्याचे आदेश महापौर टिळक यांनी दिले. त्यावेळी विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी गोंधळ घातल्याने प्रशासनाचा खुलासा समजू शकला नाही.

पुढील महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि महापालिका प्रशासन विरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे दिलीप बराटे यांनी सांगितले. मागील तीन वर्षांत या सत्ताधाऱ्यांनी 1 ही प्रकल्प पूर्ण केला नाही, दोन वर्षांत ते काय करणार, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.