Wakad : मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ

Marital harassment due to having a daughter

एमपीसी न्यूज – मुलगी झाल्याने वंशाला दिवा नाही, असे म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेला मारहाण करून छळ केला,  अशी फिर्यादी विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना सन 2018 पासून 8 डिसेंबर 2019 या कालावधीत काळेवाडी येथे घडली आहे.

गणेश लक्ष्मण पिंपळकर (वय 26), रेखा लक्ष्मण पिंपळकर (वय 50), अपर्णाला अर्जुन जाधव (वय 34, सर्व रा. ओटास्किम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 21 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी लग्नामध्ये सोन्याची चेन दिली नाही. तसेच फिर्यादीला मुलगी झाल्याने वंशाला दिवा नाही, असे म्हणत आरोपींनी वारंवार टोमणे मारून बोलले, शिवीगाळ करून विवाहितेला हाताने मारहाण केली.

तसेच धमकी देऊन फिर्यादी महिलेला क्रूर वागून देत शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.