Chinchwad : मजुराची वाट पाहत थांबलेल्या ठेकेदाराला मारहाण

Beating a contractor waiting for a laborer

एमपीसी न्यूज – मजुराची वाट पाहत थांबलेल्या ठेकेदाराला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 9) रात्री पावणेनऊ वाजता चापेकर चौकातील भाजी मंडईजवळ घडली.

प्रभू सदाशिव गळगे (वय 36, रा. काळेवाडी) असे जखमी ठेकेदाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 10) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दत्त कटारे (रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) आणि त्याच्या दोन ते तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजता फिर्यादी प्रभू हे त्यांच्याकडे काम करणारा मजूर लिंगाप्पा पावडे यांची वाट पाहत चापेकर चौक चिंचवड येथील भाजी मंडईजवळ थांबले होते.

त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी ‘इथे का थांबला’ असे म्हणून विनाकारण दगडाने, कमरेच्या बेल्टने आणि लाथाबुक्क्यांनी मारले. यात प्रभू जखमी झाले.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.