Wakad News : खुनाच्या गुन्ह्यातील तीन महिन्यांपासून फरार आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – व्यवसायाच्या आर्थिक वादातून आरोपी गणेश सुभेदार पवार व त्याच्या साथीदारांनी रहाटणी येथील संतोष अंगरख यांचा 16 ऑगस्टला कासारसाई येथे नेऊन खून केला होता. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती तर, दोन आरोपी फरार झाले होते. त्यापैकी एकजणाला वाकड पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.

संदीप ऊर्फ घुंगरु लालजी कुमार (वय 21, रा. मु. जनी, पो. रामापुर, ता. ज्ञानपुर, जि. भदोही उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील संतोष अंगरख यांच्या खून प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यासाठी पथक रवाना करण्याचे आदेश आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिले होते. त्यानुसार, वाकड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांना लेखी आदेश दिले होते.

वाकड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिष माने व पोलीस अंमलदार विक्रम जगदाळे, जावेद पठाण, नितीन गेंगजे, शाम बाबा हे फरार आरोपींचा शोध घेत होते. आरोपी संबंधित तांत्रिक व इतर माहीती घेतली असता तो उत्तर प्रदेश येथे पळुन गेला असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिष माने व पथकातील पोलीस अंमलदार विक्रम जगदाळे, जावेद पठाण, नितीन गेंगजे यांनी उत्तर प्रदेश येथे जाऊन स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपीला अटक केली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.