Wakad News : वाकड पोलिसांच्या रक्तदान शिबिरात 65 पिशव्यांचे रक्त संकलन

एमपीसी न्यूज – वाकड पोलीस ठाणे, पी. डी. फाउंडेशन थेरगाव आणि मोरया ब्लड बँक चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या रक्तदान शिबिरात 65 पिशव्या रक्त संकलन झाले. कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा पडू नये यासाठी सामाजिक बांधिलकी जपत वाकड पोलिसांनी हे तिसऱ्यांदा आयोजित केलेले रक्तदान शिबिर होते.

कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवू नये यासाठी वाकड पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत आजवर तीन वेळा रक्तदान शिबिर आयोजित केले. सर्व शिबिरांना पोलीस बांधव आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. रविवारी (दि. 1) वाकड चौकी येथे तिसरे रक्तदान शिबिर पार पडले.

रक्तदान शिबीराचे उद्घाटन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या उपस्थितीत झाले. शिबीरामध्ये वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान करुन रक्तदानाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली.

पी. डी. फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील उत्स्फूर्त रक्तदान केले. तसेच वाकड आणि पिंपरी चिंचवड शहरातील इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिरात 65 पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. हे रक्तदान शिबीर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

वाकड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश स्वामी, उपनिरीक्षक रविंद्र मुदळ, मोहिनी थोपटे, मधुकर कोळी, विजय वेळापुरे, उगले, चौधरी, दुधाळ, मुकेश येवले, मंडप व डेकोरेशन करणारे श्री ववले महाराज, मोरया ब्लड बँकेचे डॉ. कमलेश डिंबळे, त्यांचे सहकारी, पी. डी. फाउंडेशनचे औदुंबर कळसाइत, उमेश पाटमस आदींनी विशेष परिश्रम घेवून रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पाडले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.