Wakad News : हल्दीराम व सिद्धिविनायक ॲग्री  प्रोसेसिंग कंपनीची 43 लाख रूपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – हल्दीराम व सिद्धीविनायक ॲग्री प्रोसेसिंग कंपानीची एका बनावट ई-मेल धारकाने 43 लाख रूपयांची फसवणूक केली आहे. अमेरिकेतून हल्दीराम कंपनीसाठी लागणाऱ्या मशीनच्या ऑर्डरची रक्कम आपल्या खात्यावर घेऊन ई-मेल धारकाने ही फसवणूक केली आहे. 05 ते 08 ऑक्टोबर 2021 दरम्यान हा प्रकार घडला.

याप्रकरणी विशाल प्रमोदचंद्र गांधी (वय 35, रा. वाकड, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार [email protected] या ई-मेल धारक व बँक खातेधारकाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धीविनायक ॲग्री  प्रोसेसिंग कंपानीने हल्दीराम कंपनीसाठी अमेरिकेतील केबलवे कन्वेअर्सकडे एका मशीनची ऑर्डर दिली होती. अज्ञात इसमाने अमेरिकेतील या कंपनीचा बनावट ई-मेल तयार केला व कंपनीच्या बँक खाते क्रमांक बदलला असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने मशीन ऑर्डरचे पैसे आपल्या खात्यावर जमा करून घेत, 55 हजार 250 युएस डॉलर (43 लाख 09 हजार 500 रूपये) एवढ्या रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.