Wakad News : शेअर मार्केटमधून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सहा लाखांची फसवणूक 

एमपीसी न्यूज – शेअर मार्केटमधून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सहा लाखांची फसवणूक केली आहे. 24 जून 2020 रोजी दत्तमंदिर रोड, वाकड येथे हा प्रकार घडला. 

प्रशांत दिलीप दलाल (वय 33, रा. दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी मंगळवारी (दि.08) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजवर्धन, अकाउंट सेक्शन दीपक आणि मॅनेजर राहुल (पूर्ण नावे माहीत नाही) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 406,420 यासह माहिती तंत्रज्ञान सुधारित कायदा 2008 कलम 66 सी, 66 डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दलाल यांना आरोपीने फोन करून शेअर मार्केटमधून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर आपला बॅंक खाते क्रमांक देऊन त्यावर पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी खात्यावर विविध मार्गांनी 6 लाख 88 हजार रुपये भरले. नफा म्हणून सुरवातीला फिर्यादी यांना दोन वेळा 20 हजार रुपये मिळाले. त्यानंतर कोणताही नफा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांत धाव घेतली. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.