Pimpri News : योगशिक्षक आणि मूल्यांकनकर्ता परीक्षेत चंद्रकांत भापकर यांचे यश

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या आयुष मंत्रालय संचलित योगा प्रमाणीकरण मंडळ नवी दिल्ली द्वारे घेतल्या जाणा-या योग शिक्षक व मूल्यांकनकर्ता परीक्षेत पुणे येथील चंद्रकांत भापकर यांनी यश मिळवले. ही परीक्षा देशपातळीवर घेण्यात आली.

योग शिक्षक व मूल्यांकनकर्ता परीक्षा ऑनलाईन माध्यमातून प्रात्यक्षिक व सिद्धांतिक स्वरूपात घेतली जाते. या परीक्षेसाठी भापकर यांना पतंजली योग पिठाचे श्रीराम लाखे, रत्नाकर कुलकर्णी, वल्लभ जोशी यांचे मार्गदर्शन मिळाले.

मागील वर्षी यशवंतराव चव्हाण मुक्त महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या योग शिक्षक कोविड काळातील योगाभ्यास शिबिरात चंद्रकांत भापकर यांचा विद्यापीठात प्रथम क्रमांक आला. यापुढे योग प्रसार आणि प्रचार तसेच योगाभ्यास सुरूच ठेऊन कार्य करणार असल्याचे योगगुरू चंद्रकांत भापकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.