Bhosari News : आमदार महेश लांडगे यांच्या हुकुमशाही, भ्रष्ट कारभाराला कंटाळून राजीनामा – रवि लांडगे, संजय नेवाळे

एमपीसी न्यूज – भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांचा हुकुमशाही आणि मोठा भ्रष्ट कारभार सुरु आहे. स्थानिकांना डावलले जात आहे. काम करण्याला स्वातंत्र्य दिले जात नाही. त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून नगरसेवकपदाचा राजीनामा दिला असल्याचे रवि लांडगे, संजय नेवाळे यांनी सांगितले. तसेच लवकरच आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

रवि लांडगे आणि संजय नेवाळे यांनी आज (बुधवारी) आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

रवि लांडगे म्हणाले, ”पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप रूजवण्यासाठी माझे वडिल आणि चुलते या दोघांनीही फार कष्ट घेतले आहेत. लोकांना न्याय देत असताना पक्ष म्हणून खंबीरपणे साथीची गरज असते, तीच मिळत नसेल तर पक्षात राहून उपयोग नाही. महापालिकेच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या प्रत्येक विकासकामांत भ्रष्टाचार आणि फक्त भ्रष्टाचारच झालेला आहे. प्रत्येक कामांत रिंग करून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना बळ दिले गेले आहे.

भोसरी मतदारसंघात काम करणारा असा एकही ठेकेदार नाही की ज्याला टक्केवारीसाठी दमबाजी झालेली नाही. चिखलीतील संतपीठ असो की मोशीत उभारण्यात येणाऱ्या संभाजी महाराजांचा पुतळा असो, कचरा डेपोवरील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प असो एकही काम असे नाही की जे भ्रष्टाचाराविना राबवण्यात आले आहे. भाजपला भ्रष्टाचाराची ही सर्व देणगी भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी दिलेली आहे. महेश लांडगे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून पक्षाची प्रतिमा भ्रष्टाचारी पक्ष असा झाली आहे”.

”पक्षाची अशी प्रतिमा मलिन झालेली पाहून माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला फक्त त्याकडे बघत राहणे शक्य होत नाही. मी पक्षात राहूनही अनेकदा आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून होणाऱ्या भ्रष्टाचाराला कडाडून विरोध केलेला आहे. भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मला पक्षाच्या निर्णयाविरोधातच रस्त्यावरची लढाई लढावी लागली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या सत्ताकाळात स्थायी समितीच्या सभापतीला लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली ही पक्षाला नाचक्की आणणारी घटना घडली.

त्यावरून भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांमध्ये किती भ्रष्टाचार बोकाळला आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे आता पक्षात माझा राजकीय श्वास गुदमरतो होता. भ्रष्टाचाराला विरोध करणारे भोसरी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची कटकारस्थाने केली गेली. त्यामुळे भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला असल्याचे” लांडगे यांनी सांगितले.

Watch on Youtube: काऊंटडाऊन दहावी! भाग 8 : दहावीच्या भूगोलातही मिळवा भरभरून मार्क स्मिता करंदीकर

Watch on Youtube: ऐकाआजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

संजय नेवळे म्हणाले, ”भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांचा हुकुमशाही आणि मोठा भ्रष्ट कारभार सुरु आहे. स्थानिकांना डावलले जात आहे. काम करण्याला स्वातंत्र्य दिले जात नाही. विकास कामांसाठी प्राधान्य दिले नाही. त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे”.

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

Watch on Youtube: नंदी खरंच दूध पितो?… जाणून घ्या घटनेमागील शास्त्रीय कारण 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.