Pimpri News: भाजपला मोठा धक्का! रवि लांडगे, संजय नेवाळे यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भाजपला भोसरीतून मोठा धक्का बसला आहे. शहरात भाजप रुजविणारे दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे रवि लांडगे आणि चिखलीचे संजय नेवाळे यांनी आज (बुधवारी) आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपला सहाहवा झटका बसला आहे.

Watch on Youtube: नंदी खरंच दूध पितो?… जाणून घ्या घटनेमागील शास्त्रीय कारण 
यापूर्वी भाजपचे नगरसेवक असलेल्या मोशीतील वसंत बोराटे,  पिंपळेगुरवच्या चंदा लोखंडे, पिंपळेनिलखचे तुषार कामठे यांनी नगरसेवकपदाचे राजीनामे दिले आहेत. आता रवि लांडगे आणि संजय नेवाळे यांनी आज राजीनामे दिले आहेत.

Watch on Youtube: काऊंटडाऊन दहावी! भाग 8 : दहावीच्या भूगोलातही मिळवा भरभरून मार्क स्मिता करंदीकर

रवि लांडगे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ता होते.  2017 च्या महापालिका निवडणुकीत भोसरीतील धावडेवस्ती प्रभागातून बिनविरोध निवडून आले होते. निष्ठावान असूनही मागील पाच वर्षे त्यांना महापालिकेतील एकही पद दिले नाही. त्यामुळे ते नाराज होते. त्यांनी अखेरीस आज भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे.

Watch on Youtube: ऐकाआजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

तर, संजय नेवाळे 2017 च्या निवडणुकीती चिखलीतून भाजपच्या तिटीकावर निवडून आले होते. त्यांनी महापालिका क्रीडा समितीचे सभापतीपदही भूषविले आहे. तेही भाजप, आमदार महेश लांडगे यांच्यावर नाराज होते. त्यांनीही आज राजीनामा दिला आहे. दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.