Wakad : पादचारी तरुणाचा मोबईल हिसकावला

The pedestrian snatched the youth's mobile

एमपीसी न्यूज – पादचारी तरुणाचा अनोळखी दोन चोरट्यांनी मोबईल फोन हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. 10) रात्री साडेनऊ वाजता रहाटणी येथील शुभम डेअरी सामोर घडली.

बजरंगलाल श्रीनिवास भंग (वय 30, रा. स्वामी समर्थ कॉलनी, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री फिर्यादी भंग हे रहाटणी येथील शुभम डेअरी समोरून जात होते.  त्यावेळी एका दुचाकीवरून दोन चोरटे आले.

त्यातील दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने भंग यांच्या हातातील आठ हजार रुपये किमतीचा मोबईल फोन जबरदस्तीने हिकावून चोरून नेला.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.