Wakad : घर खाली करण्याच्या कारणावरून कुटुंबीयांकडून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – घर खाली करण्यास (Wakad) सांगून कुटुंबीयाना मारहाण करत शिविगाळ केली आहे. यावरून वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.21) यमुनाननगर वाकड येथे घडली आहे.

याप्रकरणी सिद्धू तिपण्णा गोगेकर (वय 52 रा.थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.24)फिर्याद दिली आहे. यावरून मल्लीकार्जून उर्फ मल्लू गोगेकर , शेखर मुन्ना गोगेकर व महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali : संतपीठात तुळशी विवाह उत्साहात साजरा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीला आरोपी हे घरातून बाहेर काढत धमकी देत होते. यावेळी फिर्यादी हे (Wakad) तिथे गेले असता आरोपींनी फिर्यादीला तु इथे का आला म्हणत फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावरून वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.