Chakan : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू; तर एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत (Chakan) दुचाकीवरील एका तरुणाच मृत्यू झाला आहे. तर, एकजण जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.24) बिरदवाडी-चाकण रोडवर घडला.

याप्रकरणी चाकण पोलिसांनी कंटेनर चालक लिबांजी श्रीरंग घनघाव (वय 43 रा.परळी) याला अटक केली आहे. यावरून संदिप अभिमन्यू मुळे (वय 37 रा. बिरदवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या अपघातात प्रणव शिवाजी मुळे (वय 19) असे मयत तरुणाचे नाव आहे.

Wakad : घर खाली करण्याच्या कारणावरून कुटुंबीयांकडून दोघांना मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा चुलत भाऊ प्रणव मुळे व हर्षद मुळे हे दुचाकीवरून बिरदवाडीवरून चाकणच्या (Chakan) दिशेने जात होते. यावेळी आरोपीच्या ताब्यातील कंटेनरने प्रणवच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

या अपघातात प्रणव मुळे याचा मृत्यू झाला तर हर्षल मुळे हा जखमी झाला आहे. यावरून चाकण पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.