Mamurdi : पिस्टल मॅगेझीन व जिवंत काडतुसासह तरुणाला मामुर्डी येथून अटक

एमपीसी न्यूज – देहुरोड पोलिसांनी एका (Mamurdi) तरुणाला मामुर्डी येथून एक पिस्टल मॅगझीन व दोन जिवंत काडतुसासह अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.24) मामुर्डी येथील साईनगर रोड येथे करण्यात आली आहे.

दर्शन हरिभाऊ पाटील (वय 21 रा.वडगाव मावळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत पवार यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुरड पोलिसांना खबर मिळाली की एकजण शस्त्रासह साईनगर रोडवरील पुणेरी मिसळ या  हॉटेलमागे थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.

Chakan : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू; तर एकजण गंभीर जखमी

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 50 हजार रुपयांची एक पिस्टल मॅगेझीन, 2 हजार रुपयांचे दोन जिवंत (Mamurdi) काडतूस असा एकूण 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपीवर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.