Wakad : स्मार्ट सिटीत मोटारीच्या उजेडात करावा लागला अंत्यविधी

एमपीसी न्यूज – आयटी हब अशी ओळख असलेल्या वाकड परिसरातील स्मशानभूमीतील वीज पुरवठा खंडीत झाल्याने चक्क वाहनांच्या लाईट सुरु ठेवून अत्यंविधी करण्याची वेळ आली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 18) घडला.

पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. वाकड परिसर आयटी हब, उच्चभ्रुंचा परिसर म्हणून ओळखला जातो. पण याच वाकडमधील स्मशानभूमीतील वीजपुरवठा खंडीत झाल्याने चक्क वाहनांच्या लाईट सुरु ठेवून अत्यंविधी करावा लागला. वाकड स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खोदला आहे. पावसामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच स्मशानभूमी परिसरातील गुरुवारी रात्री विद्युत दिवे बंद होते. स्मशानभूमीत काळोख पसरला होता. शेवटी वाहनाच्या लाईट सुरु ठेवून अंत्यविधी करावा लागला.

स्थानिक नागरिक राम वाकडकर म्हणाले, “स्मार्ट सिटीतील आणि वाकड सारख्या प्रगतशील परिसरात अशी परिस्थिती असणे ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या सहनशीलतेचा आणखी अंत न पाहता स्मशानभूमी परिसरातील विजेचा आणि रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा. किमान नागरिकांना शेवटचा तरी मोकळा श्वास घेऊ द्या”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.