Wanwadi : दिव्यांगांच्या सुंदर सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने

एमपीसी न्यूज – कर्णबधिर मुलांचे नृत्य, दिव्यांगांनी केलेली (Wanwadi) योगासने, मानवी मनोरे, भवानीमातेचा जागर अन छत्रपती शिवरायांना नृत्यातून दिलेली मानवंदना अशा भारावून टाकणाऱ्या सादरीकरणाने दिव्यांग मुला मुलींनी उपस्थितांची मने जिंकली.

निमित्त होते, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त वानवडी येथील दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित वार्षिकोत्सवा चे या कार्यक्रमासाठी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनचे (ओएनजीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी किरण डी. एम. हे प्रमुख पाहुणे, तर पुण्यातील प्रसिद्ध आर्किटेक्ट अविनाश नवाथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी महाबळेश्वर येथील मॅप्रोचे व्यवस्थापकीय संचालक मयूर वोरा, संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे, उपकार्याध्यक्ष डॉ. स्मिता जोग, डॉ. सतीश जैन, मानद सचिव रवींद्र हिरवे, प्राचार्या शिवानी सुतार आदी उपस्थित होते.

वंदना पराडकर यांना गुणवंत सेवक पुरस्कार, महेक शेख (Wanwadi) व आदित्य भोसले यांना गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिव्यांग कल्याणकारी सेवा पुरस्कार शि. प्र. मंडळीचे रुईया मूकबधिर विद्यालयाला (संस्था), तर संभाजीनगर येथील प्रणव राजळे (व्यक्ती) यांना, तर संस्थेतील गिरणी कामगार विठ्ठल सोनटक्के व धायरी येथील अनिता चाकणकर, श्रीगोंदा येथील संतोष बोळगे यांना विशेष पुरस्कार पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यश घाडगे, अनिरुद्ध पारडे व सागर ढगे यांना कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले.

Talegaon Dabhade : कामगारांच्या उज्वल भविष्यासाठी हिताची ॲस्टेमो फाय एम्प्लॉईज युनियनचे मोठे पाऊल

ॲड. मुरलीधर कचरे यांनी प्रास्ताविकात संस्थेत दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. अविनाश नवाथे, मयूर वोरा यांनी मनोगते व्यक्त करत दिव्यांग मुलांनी सादर केलेल्या कलेचे कौतुक केले. सुमित डोळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सतीश जैन यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.