Moshi News : भंगारच्या गोदामाला आग; केमिकल बॅरलचा स्फोट, आठजण जखमी

एमपीसी न्यूज – मोशी येथे एका भंगारच्या गोदामात केमिकलचा बॅरल स्वच्छ करताना स्फोट झाला आणि आग लागली. या आगीमध्ये आठ जण जखमी झाले. ही घटना आज (गुरुवारी, दि. 17) सकाळी घडली.

मुसा मोहम्मद (वय 65), शिवराज बोईगवाड (वय 37), महादू पाडुळे (वय 45), सुरेश बोईगवाड (वय 26), पिराज बोईगवाड (वय 26), मल्लू बोईगवाड (वय 45, माधव बोईगवाड (वय 28), बालाजी बोईगवाड (वय 38) अशी जखमींची नावे आहेत.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोशी डी मार्ट जवळ असलेल्या एका भंगारच्या गोडाऊनमध्ये गुरुवारी सकाळी आग लागली. केमिकलचे बॅरल स्वच्छ करताना ही आग लागली. केमिकलच्या काही बॅरलचा स्फोट झाल्याने आग भडकली. या आगीत आठजण जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र आणि चिखली उपकेंद्राचा प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी व्यक्तींना रुग्णालयात पाठवले. भंगारच्या गोडाऊनमध्ये ही लोक राहत होते. तसेच भंगारच्या गोदामात आग रोधक यंत्रणा बसवली नसल्याने आग भडकली असल्याचे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.