Pune Metro : धुलिवंदन निमित्त मेट्रो सेवा दुपारी तीन ते रात्री दहापर्यंत राहणार सुरू

एमपीसी न्यूज – धुलिवंदन निमित्त मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 18) दुपारी तीन ते रात्री दहा या वेळेत मेट्रो सेवा सुरू राहणार असल्याची माहिती मेट्रोकडून देण्यात आली आहे.

धुलिवंदन निमित्त शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मेट्रोला विराम असेल. दुपारी तीन नंतर मेट्रो तिच्या वेळापत्रकानुसार सुरू राहील. रात्री दहा वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहील. हा बदल केवळ शुक्रवारी असेल. शनिवार पासून नियमित वेळापत्रकाप्रमाणे मेट्रो सुरू राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.