Warje News: उड्डाणपुलाच्या कठड्यावर बसून मद्यपीच्या मर्कटलीला!

एमपीसी न्यूज – पुण्यात वारजे येथील उड्डाणपुलाच्या कठड्यावर बसून एका तळीरामाने केलेल्या मर्कटलीलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कात्रज-देहूरोड बाह्यवळण रस्त्यावर वारजे उड्डाणपुलावर काल (मंगळवारी) हा प्रकार घडला. उड्डाणपुलाच्या कठड्यावर बसून या मद्यपीने अंगातला शर्ट काढला. तो उड्डाणपुलावरून खाली उडी मारतोय की दारुच्या नशेत तोल जाऊन खाली पडतोय या धास्तीने बघणाऱ्यांपैकी काहीजण काळजीत पडले आणि त्याला वाचविण्यासाठी शक्य ते प्रयत्न करीत होते तर बरेच जण त्याच्या मर्कटलीला पाहून मजाही घेत होते.

एकदा तर तो कठड्यावरून पडला देखील पण सुदैवाने पाठीमागे पुलावरच पडल्याने बचावला पण उठून पुन्हा तो कठड्यावर चढला.

 वारजे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेऊन कुटुंबियांच्या ताब्यात सोपवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III