Pune : ….आणखी सात जण शहर पोलीस दलातून निलंबित

आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आदेश

एमपीसी न्यूज-.आणखी सात जणांना पुणे  शहर पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. वारजे पोलीस ठाण्यातील(Pune ) वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.सराईत गुन्हेगाराविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असूनही कठोर कारवाई केली नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश शनिवारी (दि.1) काढले.

पोलीस आयुक्तांनी कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात सुरवात केली आहे. सराईत गुन्हेगार पपुल्या वाघमारे याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे सात गुन्हे दाखल आहेत.तसेच वारजे भागात काही दिवसांपूर्वी वाहनांची तोडफोड करून दहशत माजविली होती . तरीही वारजे पोलिसांनी त्याच्यावर ‘मोका’ची कारवाई केली नाही.वारजे पोलिसांनी कायदेशीर बाबीचा अभ्यास न करता जुजबी तडीपारीचा प्रस्ताव दाखल केला. गुन्हेगारांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यामुळे ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे.

वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू सायप्पा हाके, पोलीस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे, पोलीस उपनिरीक्षक मनोज रामदास बागल, पोलीस उपनिरीक्षक यशवंत भिमशा पडवळे, पोलीस उपनिरीक्षक जनार्दन नारायण होळकर, पोलीस नाईक अमोल विश्वास भिसे आणि पोलीस नाईक सचिन संभाजी कुदळे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.

Kondhwa : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू

 

नुकतीच  कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी आणि सहकारनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात (Pune ) आली आहे. त्यानंतर आता वारजे पोलीस ठाण्यातील सात जणांवर झालेल्या कारवाईमुळे पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.