Pimpri news : एमआयडीसीकडून गुरुवारी पाणीपुरवठा बंद

 एमपीसी न्यूज : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रामधील देखभाल व दुरुस्ती कामकाज केले जाणार आहे. (Pimpri News) स्थापत्य देखभाल व दुरुस्ती विभागामार्फत गुरुवारी 29 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे एमआयडीसी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सी.एम.इ.,आर अँड डी दिघी व व्हीएसएनएल दिघी या भागांचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे. तसेच देहूरोड शहरातील देहूरोड, एफडीआर देहू रोड व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड चा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे.

Pune Crime : सावत्र मुलीसोबत जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न, सावत्र बापाला अटक

एमआयडीसीच्या रावेत येथील जल शुद्धीकरण केंद्रामधील देखभाल दुरुस्ती कामकाज केले जाणार आहे. स्थापत्य देखभाल दुरुस्ती विभागा मार्फत गुरुवारी 29 डिसेंबर रोजी सकाळी 8 वा ते सायंकाळी 6  वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे एमआयडीसी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच शुक्रवारी 30 डिसेंबर 2022 रोजी पाण्याचा पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या भागातील सर्व नागरिकांनी कृपया याची नोंद घेऊन आवश्यक तो पाण्याचा साठा अगोदर करून ठेवावा व महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन एमआयडीसी ने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.