Pune Crime : सावत्र मुलीसोबत जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न, सावत्र बापाला अटक

एमपीसी न्यूज : सावत्र मुलीचा विनयभंग करून तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सावत्र बापाला अटक करण्यात आली आहे. (Pune Crime) चंदन नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 वर्षीय सावत्र बापाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीने या प्रकरणी तक्रार दिली. 

PCNTDA : 201 लाभार्थ्यांना जमीन परतावा देणे बाकी; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत उत्तर

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी हा फिर्यादी मुलीचा सावत्र बाप आहे. सप्टेंबर 2021 पासून तो सातत्याने या मुलीला त्रास देत होता. (Pune Crime) आरोपीने फिर्यादीला मिठी मारून आय लव यू म्हणत तिच्या सोबत जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारानंतर फिर्यादी मुलीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.