23.3 C
Pune
गुरूवार, ऑगस्ट 11, 2022

WCT20 : T20 वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड क्रिकेट संघाची घोषणा, केन विल्यमसनकडेच नेतृत्व

spot_img
spot_img

मपीसी न्यूज – संयुक्त अरब अमिरात (यूएई) याठिकाणी ऑक्टोबरमध्ये T20 वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी तब्बल दोन महिने अवकाश आहे. पण, न्यूझीलंडने केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली आपल्या संघाची घोषणा केली आहे. T20 वर्ल्डकपसाठी संघ जाहीर करणार न्यूझीलंड पहिला संघ ठरला आहे.

न्यूझीलंडने वर्ल्डकपसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. T20 वर्ल्डकप 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाणार आहे. संघाची कमान केन विल्यमसनकडे सोपवण्यात आली आहे. विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड 2019 च्या एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोचला होता. तसेच, भारतासोबत नुकत्याच झालेल्या पहिल्या जागतिक कसोटी स्पर्धेचे अजिंक्यपद देखील या संघाने पटकावले आहे.

न्यूझीलंडने रॉस टेलर, कॉलिन डी ग्रँडहोम आणि फिन एलन यांना संघातून वगळले आहे.

 
* असा आहे संघ

केन विल्यमसन (कर्णधार), टॉड एश्ले, ट्रेंट बोल्ट, मार्क कॅम्पमन, डेव्हॉन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, काईल जॅमिसन, डेर्ली मिशेल, जिमी निशाम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट, ईश सोधी, टिम साऊदी, एडम मिल्ने.

spot_img
Latest news
Related news