Weather Report : पुण्यात मध्यम, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता

Chance of moderate to heavy rains in Pune and sparse places in Central Maharashtra ण्यात मध्यम स्वरूपाचा तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता आहे.

एमपीसी न्यूज – पुण्यात मध्यम स्वरूपाचा तर मध्य महाराष्ट्र व कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात जोरदार तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या 24सांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) ( 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे

कोकण आणि गोवा : माथेरान 9, जव्हार, सुधागड पाली 8 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), कर्जत, खालापूर, रोहा, तलासरी 7 प्रत्येको, अलिबाग, पालघर, विक्रमगड, वाडा 6 प्रत्येकी, भिरा, कल्याण, कणकवली, पनवेल, पोलादपूर, सावंतवाडी, वैभववाडी, वसई 5 प्रत्येकी , भिवंडी, कुडाळ, मंडणगड, मोखेडा एफएमओ, राजापूर, उल्हासनगर, उरण 4 प्रत्येका, अंबरनाथ, डहाणू, देवगड, दोडा मार्ग, हर्णे, खेड, लांजा, माणगाव, म्हसळा, मुंबई (सांताक्रूझ), मुरबाड, मुरुड, शहापूर , ठाणे, वाल्पोई 3 प्रत्येकी, चिपळूण, दापोली, महाड, मालवण, मडागव, पेडणे, केपे, रत्नागिरी, संगमेश्वर देवरुख, सांगे, श्रीवर्धन 2 प्रत्येकी, गुहागर, पणजी (गोवा), रामेश्वर कृषी 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर 12, इगतपुरी 11, वेल्हे 9, गगनबावडा, राधानगरी 8 प्रत्येकी, जावळी मेधा 5, आजारा, हर्सूल एफएमओ, पेठ, त्र्यंबकेश्वर 4 प्रत्येकी, चंदगड, ओझर (नाशिक एपी), ओझरखेडा एफएमओ, पन्हाळा, शाहूवाडी, वडगाव, मावळ 3 प्रत्येकी, गारगोटी / भुदरगड, पोड मुळशी, साक्री, शिरपूर, सुरगणा 2 प्रत्येकी, अक्कलकुवा, आंबेगाव घोडेगाव, भोर, देवळा, गडहिंग्लज, पाटण 1 प्रत्येकी.

विदर्भ : गोंदिया, गोरेगाव, मोहाडी, रामटेक 5 प्रत्येकी, सालेकसा 4 प्रत्येकी, आष्टी, भामरागड, धानोरा, खरंगा, सडक अर्जुनी, तिरोरा, वरुड 3 प्रत्येकी, चांदूर बाजार, हिंगणघाट, लाखनी, मौदा, नागपूर एपी, साकोली 2 प्रत्येकी, अहिरी, आमगाव, अमरावती, अर्जुनी मोरगाव, बाटकुली, भंडारा, देवळी, देवरी, एटापल्ली, गडचिरोली, हिंगणा, कळमेश्वर, कंपटी, काटोल, कुही, मोर्सी, मूल चेरा, नांदगाव काजी, नरखेडा, सावनर, तिवासा, तुमसर 1 प्रत्येकी.

घाटमाथा : लोणावळा (टाटा) 18, अम्बोणे 15, लोणावळा (ऑफिस) 13, वळवण 10, शिरोटा, शिरगाव, खोपोली, धरावी 7 प्रत्येकी, दावडी, डुंगरवाडी 6, ठाकूरवाडी, वाणगाव, भिरा 5 प्रत्येकी, कोयना (पोफळी), खंद 4 प्रत्येकी, कोयना (नवजा), भिवपुरी 3 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज :

7-11 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

7 जुलै : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

8-11 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

पुण्यात मध्यम स्वरूपाचा तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.