Weather Report : विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Chance of torrential rain in sparse places in Vidarbha

एमपीसी न्यूज – राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. मागील २४ तासांत कोकण – गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मागील दोन दिवसापासून राज्यात बहुतांश ढगाळ वातावरण असून उकाडा वाढल्याचे चित्र आहे. पुणे हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार कोकण – गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल पश्‍चिम मध्य प्रदेशच्या काही भागात, पूर्व मध्य प्रदेशच्या बहुतांश भागात, पूर्व उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात कायम असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

# गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त)
खालीलप्रमाणे ( दि. 22, सकाळी 8.30 वाजेपर्यंत)

कोकण आणि गोवा : अंबरनाथ, भिरा, जव्हार, कल्याण, उल्हासनगर 6 .प्रत्येकी, म्हसाळा, ठाणे 5 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), चिपळूण, गुहागर, हरनाई, पेण, पोलादपूर, केपे, रोहा, सुधागड पाली 3 प्रत्येकी, कानकोन, दापोली, लांजा, मंडणगड , माणगांव, मडगाव, पेडणे, संगमेश्वर देवरूख, श्रीवर्धन, विक्रमगड 2 प्रत्येकी, अलिबाग, भिवंडी, दाभोलिम (गोवा), देवगड, दोडामार्ग, खेड, महाड, माथेरान, मोखेडा मुल्दे , मुरबाड, पणजी (गोवा), राजापूर, रामेश्वरी, सावंतवाडी, शहापूर, वाल्पोई, वैंगुर्ला, वाडा 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा, जामखेड 2 प्रत्येकी, इगतपुरी, लोणावळा (कृषी), महाबळेश्वर, ओझरखेडा, पन्हाळा, पेठ 1 प्रत्येकी.

मराठवाडा : रेणापूर 3, लातूर, शिरूर अनंतपालर 1 प्रत्येकी.

विदर्भ : भामरागड 3, अहीरी, एटापल्ली 2 प्रत्येकी, चामोर्शी, धानोरा, घाटंजी, कळंब, कोरची, मुलचेरा, सालेकसा, सिरोंचा, वणी 1 प्रत्येकी.

घाटमाथा : ताम्हिणी 7, शिरगाव 6, इुंगरवाडी 5, कोयना (पोफळी) 4, कोयना (नवजा), अम्बोणे, लोणावळा (ऑफिस) 2 प्रत्येकी, वळवण, लोणावळा (टाटा), खंद, दावडी 1 प्रत्येकी

# पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा

कोकण – गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.