Weather Report : पुण्यात मध्यम तर मुंबईत तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

पुणे वेधशाळेचा इशारा : Extreme levels of rainfall are expected in Pune and in Mumbai

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत पुण्यात मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई शहर व उपनगरात मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकण गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : पालघर 46, तलासरी 39, डहाणू 38, दोडा मार्ग 28, माथेरान, पेडणे, राजापूर 25 प्रत्येकी, वैभववाडी 24, भिरा, संगमेश्वर देवरुख 23 प्रत्येकी, पोलादपूर, रत्नागिरी, वसई 22 प्रत्येकी, विक्रमगड 20, चिपळूण, रामेश्वर कृषी, वाडा 19 प्रत्येकी, भिवंडी, कल्याण, कुडाळ, ठाणे 17 प्रत्येकी, जव्हार, मंडणगड 16 प्रत्येकी, कर्जत, लांजा, महाड 15 प्रत्येकी, खालापूर 14, दापोली, उल्हासनगर 13, अंबरनाथ, मालवण 12, बेलापूर (ठाणे), खेड, माणगाव, पनवेल, सावंतवाडी 11 प्रत्येकी, केपे, वाल्पोई 10 प्रत्येकी, देवगड, म्हसळा, मोखेडा, पेण, श्रीवर्धन, सुधागड पाली 9 प्रत्येकी, अलिबाग, कणकवली, मुंबई (संताक्रूझ) 8 प्रत्येकी, गुहागर, मडागाव, रोहा 7 प्रत्येकी, हरनाई, म्हापसा, मुरबाड, पणजी (गोवा) 6, मार्मगोवा, शहापूर 5 प्रत्येकी, कानकोना, उरण 4 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: महाबळेश्वर 32, गगनबावडा 31, चांदगड 20, लोणावळा (कृषी) 19, वेल्हे 18, आजारा 16, भोर 13, इगतपुरी, पौड मुळशी 11 प्रत्येकी, पन्हाळा 10, जावली मेधा, पाटण, राधानगरी, शिराळा 9 प्रत्येकी, कागल 8, कोल्हापूर , शाहूवाडी, वाई 7 प्रत्येकी, पुणे, सातारा, त्र्यंबकेश्वर, वडगाव मावळ 6 प्रत्येकी, गडहिंग्लज, गारगोटी, हातकणंगले, खंडाळा बावडा, पुरंदर सासवड 5 प्रत्येकी, कडेगाव, कराड, कोरेगाव 4 प्रत्येकी, आंबेगाव घोडेगाव, खेड राजगुरूनगर, मिरज, सांगड वाळवा इस्लामपूर 3 प्रत्येकी, बारामती, जुन्नर, खटाव वडुज, तासगाव 2 प्रत्येकी, दहिवडी माण, जळगाव, जामखेड, जत, कवठे महाकाळ, पलूस, पारोळा, पेठ, फलटण, विटा 1 प्रत्येकी.

मराठवाडा: औंधा नागनाथ, हिंगोली 4 प्रत्येकी, सेलू 3, अंबड, धर्मबाद, कळमनुरी, कंधार, मुदखेड, मुखेड 2 प्रत्येकी, औरंगाबाद, देगलूर, घनसावंगी, जिंतूर, लोहा, उस्मानाबाद, परतूर, रेणापूर, सेनगाव, उमारी 1 प्रत्येकी.

विदर्भ: सावनेर 4, गोंड पिपरी, रामटेक, सडक अर्जुनी 3 प्रत्येकी, अहीरी, अर्जुनी मोरगाव, कामठी, काटोल, कुरखेडा, लाखंदूर, पारशिवनी 1 प्रत्येकी.

घाटमाथा: ताम्हिणी 36, शिरगाव, दावडी 35 प्रत्येकी, डुंगरवाडी 34, अम्बोणे 25, कोयना (पोफळी) 21, कोयना(नवजा), लोणावळा (टाटा) 19 प्रत्येकी, लोणावळा (ऑफिस) 16, खंद, वळवण 13 प्रत्येकी, खोपोळी 12, भिवपुरी 11, शिरोटा 8, वाणगाव 7, ठाकूरवाडी 6

पुढील हवामानाचा अंदाज:

06 ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

07 ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

08 ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही पाऊस पडण्याची शक्यता.

09 ऑगस्ट: कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

इशारा:

06 ऑगस्ट: उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

07 ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

08 ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

09 ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

पुण्यात मध्यम स्वरुपाचा तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात जोरदार तर तुरळक ठिकाणी ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.