Pimpri: गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा, क्षेत्रीय कार्यालयांतून मिळणार परवानगी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांची ॲटो क्लस्टर येथील सभागृहात बैठक . Celebrate Ganeshotsav in a simple way, permission will be obtained from regional offices

एमपीसी न्यूज – कोविड – 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करून गणेश मंडळांना आवश्यक असणारे परवाने क्षेत्रिय कार्यालयांमार्फत उपलब्ध करून दिले जातील, असे पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पालिका कार्यक्षेत्रातील कोविड – 19 साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांची ॲटो क्लस्टर येथील सभागृहात बैठक घेण्यात आली.

ऑनलाइनद्वारे झालेल्या या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, भुमी आणि जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप तसेच आदर्श मित्र मंडळ -काळेवाडी, श्रीकृष्ण गणेश तरुण मंडळ-काळभोर नगर, मधुबन सोसायटी-सांगवी तसेच अन्य गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यांनी कोरोना कोविड –19 साथरोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन गृह विभागाकडील शासन परिपत्रका नुसार सार्वजनिक गणेशोत्सव 2020 मार्गदर्शक सूचना नुसार योग्य ती दक्षता घेण्याचे सार्वजनिक मंडळांना आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.