Weather Report: गोवा व महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Weather Report: Heavy rains likely at sparse places in Goa and Maharashtra

एमपीसी न्यूज – गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. पुणे आणि मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. विदर्भात बहुतांश ठिकाणी, कोकण-गोवा व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: मुंबई (सांताक्रूझ) 5, ठाणे 3, सावंतवाडी 2, अंबरनाथ, भिवंडी, डहाणू, कल्याण, लांजा, पालघर, पनवेल, वसई 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: पाथर्डी 7, शेगाव 4, चाळीसगाव, कोपरगाव, लोणावळा (कृषी), पुणे (लोहगाव) 3 प्रत्येकी, बारामती, धुळे 1 प्रत्येकी.

मराठवाडा: अंबड 7, किनवट, सोयेगाव 6, शिरूर कासार 5, हदगाव, हिमायतनगर, कळमनुरी, माहूर 4 प्रत्येकी, हिंगोली, खुलताबाद 3 प्रत्येकी, औंढा नागनाथ, बदनापूर, मानवत, परभणी, पाथरी, पाटोदा, वडावणी 2 प्रत्येकी, आष्टी, धर्माबाद, गेवराई, घनसावंगी, माजलगाव, मुखेड, नांदेड, फुलंब्री, पूर्णा, सिल्लोड, वसमत १ प्रत्येकी.

विदर्भ: चंद्रपूर 14, बल्लारपूर 12, पोंभुर्णा 10, मुल 9, पौनी 8, चामोर्शी, गोंड पिपरी, वणी 7 प्रत्येकी, जिवती, कोरपना 6, भद्रावती, सोली 5 प्रत्येकी, मंगलुरपीर, राजुरा 4 प्रत्येकी, अहीरी, भंडारा, एटापल्ली, गडचिरोली, कुही, मारेगाव, मुल चेरा, पंढरीकावडा, उमरखेड 3 प्रत्येकी, अर्जुनी मोरगाव, आर्मोरी, बदकुली, भामरागड, भिवापूर, चिखली, चिमूर, दर्यापूर, धानोरा, कुरखेडा, लाखांदूर, महागाव, मालेगाव, मानोरा, मोताळा, नंदुरा, शिंदेवाडी, उमरो वाशिम, जरी झमानी 2 प्रत्येकी, आमगाव, अमरावती, अंजनगाव, आर्वी, बाळापूर, देसाईगंज, दिग्रस, घाटंजी, कळंब, कारंजा लाड, खामगाव, कोरची, लाखनी, मलकापूर, मोदा, मेहकर, मूर्तिजापूर, नागपूर, पातूर, पुसद, रिसोड, समुद्रपूर, सिंधखेड राजा, वरोरा, वरुड 1 प्रत्येकी.

घाटमाथा:, कोयना (नवजा) 3, लोणावळा (टाटा), लोणावळा (ऑफिस), वळवण, कोयना (पोफळी) 2 प्रत्येकी, ताम्हिणी, भिवपुरी, अम्बोणे, खांडी 1 प्रत्येकी.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव: विहार, तुलसी 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

24 जुलै: गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

25 जुलै: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

26 जुलै: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

27 जुलै: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

24 जुलै: गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

25 जुलै: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

२6 जुलै: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.