Weather Report : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

महाराष्ट्र किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान :

कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : वेंगुर्ला 26, मालवण 25, रामेश्वर कृषि 24, मार्मगोवा 20, दाभोलिम (गोवा), पणजी (गोवा) 17 प्रत्येकी, दोडामार्ग 15, कुडाल 14, मडगाव, पेडणे, फोंडा 13 प्रत्येकी , म्हापसा 12, कानकोन, केपे, साळंगे, वलपोई 11 प्रत्येकी, देवगड 10, सावंतवाडी 9, कल्याण, कणकवली, लांजा, रोहा, उल्हासनगर 7 प्रत्येकी, अंबरनाथ, माथेरान 6 प्रत्येकी, रत्नागिरी, वैभववाडी 5 प्रत्येकी, राजापूर, वाडा 4 प्रत्येकी, अलिबाग, हरनाई, माणगाव, श्रीवर्धन 3 प्रत्येकी, बेलापूर ( ठाणे), भिवंडी, कर्जत, मोखेडा ए, मुंबई (सांताक्रूझ), पेन, ठाणे 2 प्रत्येकी, गुहागर, जव्हार, खालापूर, खेड, पालघर, पनवेत्र, पोलादपूर,
शहापूर, सुधागड पाली, वसई, विक्रमगड 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: दिंडोरी 10, अक्कलकुवा, अकोले, 8 प्रत्येकी, चांदगड, खेड राजगुरूनगर, विटा 7, पारनेर 6, गिरना धरण, कवठेमहाकाळ, नेवासा 5 प्रत्येकी, नांदगाव, पारोळा, पेठ, शहादा, वाई 4 प्रत्येकी,
चांदवड, धरणगाव , इगतपुरी, जळगाव, मुळदे, नंदुरबार, पुणे, सतना बागलाण, शिरोळ, सुरगाणा, तळोदा 3 प्रत्येकी, चोपडा, दहीगाव, देवळा, नवापूर, ओझर (नाशिक एपी), संगमनेर, तासगाव 2 प्रत्येकी , आजारा, अमळनेर, आंबेगाव घोडेगाव, बोदवड, हर्सूल, कळवण, मिरज, ओझरखेडा, पलूस, पंढरपूर, पुरंदर सासवड, सिन्नर 1 प्रत्येकी.

मराठवाडा : शिरूर अनंतपात्र 9 प्रत्येकी, हिंगोली 8, औरंगाबाद एपी, कळमनुरी 6 प्रत्येकी, गंगापूर, खुलताबाद, पाटोदा 4, भूम, माहूर, परंडा, उमरी 3 प्रत्येकी, अंबेजोगाई, धर्मबाद, हदगाव, कळंब, किनवट,
पैठण 2 प्रत्येकी, अंबड, औंध नागनाथ , लातूर, पालम, रेणापूर 1 प्रत्येकी.

विदर्भ : कुही 9 प्रत्येकी, भामरागड 5, एटापल्ली, घाटंजी, जिवती, कोरपना, मोहाडी, मूल चेरा, पंढरीकावडा, सेलू, उमरेड, वरोरा 3 प्रत्येकी, अंजनगाव, आर्वी, चामोर्शी, चिमूर, दर्यापूर, हिंगणघाट, हिंगणा, कामठी, महागाव, मारेगाव, मौदा, मोर्सी, नरखेडा, पर्सेओनी, पोंभुर्णा, पुसद, राजुरा, राळेगाव, सालेकसा, तेलहरा, तिवासा, तुमसर, उमर खेड, जरी झमणी 2 प्रत्येकी, अहीरी, आमगाव, आष्टी, भद्रावती, भिवापूर, चांदूर बाजार, चांदूर , देवळी, देवरी, धामणगाव, दिग्रस, गोंड पिपरी, कळंब, कळमेश्वर, काटोल, लाखंदुर, मूर्तिजापूर, नागपूर एपी, परटवाडा, पौनी, रामटेक, सडक अर्जुनी, समुद्रपूर, तिरोरा, वणी,
वर्धा, वाशिम, येवतमल 1 प्रत्येकी.

घाटमाथा : खोपोली, कोयना(पोपळी) 4 प्रत्येकी, लोणावळा(ऑफिस) 3 लोणावळा (टाटा) 2, वळवण, अम्बोणे 1 प्रत्येकी .

_MPC_DIR_MPU_II

पुढील हवामानाचा अंदाज:

23 सप्टेंबर: कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

24 सप्टेंबर: कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

25 सप्टेंबर: कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

26 सप्टेंबर: कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

23 सप्टेंबर: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

24 सप्टेंबर: कोकण गोव्यात व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

25-26 सप्टेंबर: काही नाही

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.