Weather News : राज्यात थंडीचा जोर आणखी वाढला

परभणीत सर्वाधिक 7.6 ; तर पुणे 8.1 अंश सेल्सियस !

एमपीसी न्यूज : अरबी समुद्रावरून वाहणारे थंड वारे उत्तर दिशेकडून दक्षिणे दिशेला वाहू लागले आहेत. परिणामी राज्यात थंडीचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे परभणीत सर्वाधिक 7.6, गोंदिया किमान तापमान 7.8 अंश सेल्सिअस  त्याखालोखाल पुणे येथे 8.1 अंश सेल्सियस तापमान नोंदविले गेले.

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे 8.1, लोहगाव 10.6, कोल्हापूर 14.5, महाबळेश्वर 11.3, मालेगाव 10.2, नाशिक 8.4, सांगली 12.6, सातारा 9, सोलापूर 12.1,  मुंबई 20, सांताक्रुझ 16, रत्नागिरी 18.2, पणजी 18.6, डहाणु 16.6, औरंगाबाद 9.2, परभणी 7.6, अकोला 9.6, अमरावती 12.5, बुलढाणा 11, ब्रम्हपूरी 10.5, चंद्रपूर 9.6, गोंदिया 7.8, नागपूर 8.6, वाशिम 10.2, वर्धा 10.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर भारतात थंडीची लाट आली असून हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तरेकडील थंड वारे दक्षिणेकडे येऊ लागले आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. ही स्थिती 15 जानेवारी 2021 पर्यंत राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस विदर्भासह राज्याच्या अन्य भागांमध्ये तापमानात आणखी घट होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.