Weather Update : पुण्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता

Chance of light rain with thunder in Pune

एमपीसी न्यूज – कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. पुण्यात मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर, मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील, अशी शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यात पाऊसाने उघडीप दिली आहे. मात्र, आज (बुधवारी ) सकाळपर्यंत राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

पुणे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल कच्छ, गुजरात व मध्य प्रदेशच्या उर्वरित भागात, राजस्थान, चंदीगड व उत्तर पंजाबच्या काही भागात, उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेशच्या बहुतांश भागात आणि उत्तराखंड व जम्मू काश्मीर व लदाखच्या संपूर्ण भागातून झाली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान:

कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.

* गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे ( दि. 24, सकाळी 8.30 वाजेपर्यंत)

कोकण आणि गोवा : मुळदे, वेंगुर्ला 6 प्रत्येकी, कुडाळ, मालवण 5 प्रत्येकी, कानकोन, दाभोलीम (गोवा), कणकवली, सुधागड पात्री 3 प्रत्येकी, लांजा, मार्मगोवा, रामेश्वरी, सावंतवाडी, श्रीवर्धन 2 प्रत्येकी, देवगड, गुहागर, हर्णे, खेड, मडगाव, मुरुड, पेण, पेडणे, उरण, वाल्पोई 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : अमळनेर 3, इगतपुरी 2, गगनबावडा, गारगोटी / भुदरगड, रहाटा 1 प्रत्येकी.

मराठवाडा : सोनपेठ 2, भोकरदन, जळकोट 1 प्रत्येकी.

विदर्भ : मुलचेरा 4, अहीरी, जिवती, सिरोंचा 3 प्रत्येकी, चामोर्शी, कोरपना, मुल 2 प्रत्येकी, भंडारा, ब्रम्हपुरी, चिखली, एटापल्ली, गोंदिया, कुरखेडा, लाखंदूर, सडकअर्जुनी, वणी 1प्रत्येकी.

घाटमाथा : कोयना (नवजा) 3, कोयना (पोफळी) 1.

 हवामानाचा अंदाज व इशारा

कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. पुण्यात मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर, मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील, अशी शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.