Pune Crime News : काय सांगता… चोरट्यांनी चक्क पोस्ट बॉक्सच नेला चोरून

एमपीसीन्यूज : चोर कशाची चोरी करेल सांगता येत नाही. अशीच एक घटना शहरातील यशवंतनगरमध्ये घउली आहे. चोरट्यांनी बसस्थानकाच्या मागे असलेल्या भिंतीवरील लोखंडी पोस्ट बॉक्स पेटी चोरून नेली. ही घटना 18 नोव्हेंबरला घडली आहे.

याप्रकरणी आकाश पुंड (वय 26, रा. देउळगाव, दौंड) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चतुःशृंगी परिसरातील यशवंतनगरमध्ये पोस्ट खात्याने नागरिकांना पत्र टाकण्यासाठी लोखंडी पेटी भिंतीला अडकवून ठेवली होती. वर्षानुवर्षे ही पेटी तेथेच होती. मात्र, 18 नोव्हेंबरला चोरट्यांनी पोस्ट खात्याची लोखंडी पेटी चोरून नेली.

याप्रकरणी पोलीस नाईक विक्रम वीर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.