Pune : रुग्णालयात कपडे बदलत असताना महिलेचा अश्लील व्हिडीओ काढला, वॉर्डबॉय ताब्यात

एमपीसी न्यूज -पोट दुखत असल्यामुळे पुण्यातील एका प्रसिद्ध रुग्णालयात एमआरआय काढण्यासाठी आलेली महिला कपडे बदलत असताना रुग्णालयातील वॉर्डबॉयनेच लपून तिचा अश्लील व्हिडीओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित वॉर्डबॉयला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, संबंधित महिला एमआरआय काढण्यासाठी या रुग्णालयात आली होती. एमआरआय काढण्यासाठी कपडे बदलत असताना रूममध्ये मोबाईल कॅमेऱ्यावर व्हिडिओ शूटिंग सुरू असल्याचे संबंधित महिलेच्या लक्षात आले. ही बाब तिने पतीला सांगितल्यावर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.