Pimpri News: बांधकाम ठेकेदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – बाबा कांबळे

छोटे बांधकाम ठेकेदार यांचा  पिंपरीत  मेळावा; बांधकाम ठेकेदार पंचायत स्थापन

एमपीसी न्यूज – बांधकाम क्षेत्रात बिल्डर विकासक अधिक नफा कमावण्यासाठी छोटे बांधकाम ठेकेदार (कॉन्ट्रॅक्टर) यांचे शोषण करत असून त्यांच्याकडून जास्त काम करून घेतले जाते. परंतु कामाचा योग्य मोबदला दिला जात नाही. काम पूर्ण केल्यानंतर देखील बिल थकविले जातात.

मोठे ठेकेदार बिल्डर बिलाचे पैसे बुडवतात. कोविड काळात बांधकाम मजूर पुरवणाऱ्या छोटे ठेकेदार यांना बिले न मिळाल्यामुळे त्यांचे खाण्यापिण्याचे हाल झाले. यामुळे अनेकांनी पायी कोसो मैल दूर असा प्रवास करत आपले गाव गाठले होते.

कोविड काळात मोठ्या प्रमाणामध्ये हाल झाले ,  बांधकाम मजुरांप्रमाणेच  थोडे पुढे गेलेले छोटे ठेकेदार यांची  संघटना स्थापन करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.

कष्टकरी कामगार पंचायत व बांधकाम ठेकेदार पंचायत वतीने  महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने बांधकाम ठेकेदार व मजूर यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होते. यावेळी बाबा कांबळे बोलत होते.  कष्टकरी जनता महिला आघाडी अध्यक्षा अनिता सावळे, घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे, बांधकाम ठेकेदार पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष राजू साव, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रंजीत शहा, कार्याध्यक्ष मुकेश ठाकूर, उपाध्यक्ष बिनेश्वर  यादव यावेळी  आदी उपस्थित होते.

गुजरात,उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, कर्नाटक, आंध्रप्रदेश, राज्यातील बांधकाम मजूर पुणे, पिंपरी-चिंचवड येथे काम करत आहेत. त्यात बांधकामाची माहिती झाल्यानंतर यातील काही व्यक्ती छोटे मोठे बांधकाम ठेकेदाराची काम करतात यात मजूर पुरवणे, प्लास्टर करणे, लोखंडी सलैया बांधणे, पेंटिंग फिटिंग प्लंबर इन फर्निचर  आदी प्रकारचे कामे  करतात.

रात्रंदिवस मेहनत काबाडकष्ट करूनही त्यांना त्यांच्या कामाचा योगे मोबदला मिळत नाही. अनेक वेळा बिल्डर कामाचे पैसे बुडवतात अशा विविध समस्यांमुळे त्रस्त झालेल्या छोटे ठेकेदार यांनी कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम ठेकेदार पंचायत या संघटनेची स्थापना केली.

महिन्याभरात एक हजारापेक्षा अधिक व्यक्ती संघटने मध्ये सहभागी झाले आहेत. पुढील काळात देखील अनेक व्यक्ती संघटनेत जोडन्याचे काम सुरु आहे, संघटनेने बाबत माहिती देण्यासाठी आणि मजूर ठेकेदारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

बाबा कांबळे म्हणाले,संघटनेच्या प्रयत्नामुळे बांधकाम मजुरांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले. बांधकाम मजुरांच्या कल्याणकारी मंडळात  दहा हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. खऱ्या बांधकाम मजुरा पर्यंत ही योजना पोहोचत नाही.

भ्रष्ट अधिकारी राजकरणी यामुळे करोडो रुपयांचा निधी पडून आहे. बोगस लाभार्थ्यांची नोंदणी सुरू आहे. हे सर्व थांबवण्यासाठी प्रत्येक बांधकाम साइटवर  जाऊन बांधकाम मजुरांची नोंदणी होणे आवश्यक आहे. येथे उपस्थित ठेकेदारांच्या एकाही मजुरास मध्यान्न भोजन, सेफ्टीकीट मिळाली नाही.

मग कामगार खाते व  कार्यालय मार्फत सुरू असलेल्या सेफ्टी किट आणि मध्यान्न भोजन याचा लाभ कोण घेत आहे, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. कुंपणच शेत खात आहे दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बांधकाम ठेकेदार पंचायत 25 व्यक्तींची कार्यकारणी समिती यावेळी जाहीर करण्यात आले. त्यांना बाबा कांबळे, अनिता सावळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. पुणे जिल्हा अध्यक्ष पदी राजू साव, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी रंजीत शहा, कार्याध्यक्षपदी मुकेश ठाकूर उपाध्यक्षपदी बानेश्वर  यादव,  कार्यकारणी सदस्य म्हणून मानसिंग राजपूत, सुखदेव पंडित ,अशोक पास्वान ,लक्ष्मण वरवटे,  मोहम्मद अंवर, ईरप्‍पा नाइके, जगदीश विश्वकर्मा ,अभिमन्यु कुमार सिंग, मुकेशकुमार राय, संतोष साव ,केदार साव,राजीव साव, मुकेश राम, अभय सिंग, तानाजी मालु,जैसवाल, फुलचंद निर्मळकर, सह विविध व्यक्तिची नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.