Hinjawadi News : भर दिवसा धारदार हत्याराने वार करत एकाचा खून

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरातील चुडोबानगर, हुलावळे बेंद्रे वस्ती येथे एका व्यक्तीवर धारदार हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत घडली.

संतोष विश्वनाथ माने (वय 38) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नी (वय 35) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फिर्यादी यांचे पती संतोष माने यांच्या कपाळावर धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी करत त्यांचा खून केला. ही घटना चुडोबानगर, हुलावळे बेंद्रे वस्ती येथे तुषार साखरे यांच्या चाळीमध्ये भरदिवसा घडली. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.