Pune : एसएनबीपी अकॅडमी, नवाल टाटा अकॅडमीचा विजय

एसएनबीपी हॉकी

एमपीसी न्यूज – यजमान एसएनबीपी ऍकॅडमी आणि नवाल टाटा हॉकी अकादमी यांनी सहज विजयासह 19 वर्षांखालील चौथ्या एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत आपली मोहिम सुरू केली.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा सुकंलात सुरू झालेल्या या स्पर्धेत संध्याकाळच्या सत्रात “ड’ गटात एसएनबीपी संगाने नंदीसिंग हॉकी अकादमीचा 2-1, तर नवाल टाटा संघाने नागपूर हॉकी अकादमी संघाचा “फ’ गटातील सामन्यात 2-1 अशाच फरकाने पराभव केला.
एसएनबीपी आणि नंदी सिंग अकादमी संघातील पहिल्या सामन्यात पूर्वार्धात चुरशीच्या खेळाचे प्रदर्शन झाले. आक्रमण प्रतिआक्रमणाच्या खेळात पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत राहिला होता. उत्तरार्धात एसएनबीपी संघाचे खाते उघडताना 54व्या मिनिटाला अक्षय यादव याने गोल केला.

अर्थात, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. नंदी सिंग संघाने चार मिनिटांच बरोबरी साधली. सिगिन मुमडू याने 58व्या मिनिटाला संघाला बरोबरी साधून दिली. बरोबरीनंतर आक्रमक झालेल्या एसएनबीपी संघाने 60व्या मिनिटाला विजयी गोल केला. शुभम लाहोरिया याने हा गोल केला.
त्यापूर्वी, झालेल्या “ई’ गटातील सामन्यात बेलकुलाई सीकेएसी विद्यापीठ या पश्‍चिम बंगालच्या संघाने सुप्रियो प्रामाणिक याच्या तीन गोलच्या जोरावर उत्तर प्रदेशाच्या कोहिनूर अकादमीचा 4-1 असा पराभव केला. कोहिनूरकडून एकमात्र गोल रितिक काश्‍यप याने 58 व्या मिनिटाला केला.
“अ’ गटातील सामन्यात रिजनल डेव्हलपमेंट संघाने मंध्यतराच्या 1-0 अशा आघाडीनंतर भिलवाडा हॉकी अकॅडमी संघाचा 8-0 असा पराभव केला. त्यांच्याकडून बिरसा दोडराई (35, 38वे मिनिट) याने दोन, तर हरसिंग बोद्रा (11वे), अर्जुन समद (36वे), सुशील दोडरी (51वे), जोबे भेंग्रा (56वे) आणि असित कुल्लु (59वे मिनिट) यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

दरम्यान, हॉकी इंडियाचे सह सचिव फिरोज अन्सारी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू अजितेश रॉय आणि आशियाई सुवर्णपदक विजेत्या संघातील रोहित हवालदार, एसएनबीपी समूहाच्या अध्यक्षा वृषाली भोसले, कार्याध्यक्ष डी. के. भोसले उपस्थित होते.

निकाल
इ गट  बेलकुलाई सीकेएसी विद्यापीठ, पश्‍चिम बंगाल 4 (सुप्रियो प्रामाणिक 30, 49, 55वे मिनिट, तिर्थंकर चौधरी 44वे मिनिट) वि.वि. कोहिनूर अकादमी, उत्तर प्रदेश 1 (रितिक काश्‍यप 58वे मिनिट) मध्यंतर 0-0

फ गट  नवाल टाटा हॉकी ऍकॅडमी 2 (अतिश डोडराय 28वे, अभिषेक टिग्गा 39वे मिनिट) वि.वि. नागपूर हॉकी ऍकॅडमी 1 (जावेद अन्सारी 37वे मिनिट), मध्यंतर 1-0

अ गट  रिजनल डेव्हलपमेंट सेंटर 8 (हरसिंग बोद्रा 11वे, भूष तिर्की 20वे, बिरसा डोडराय 35वे, 38वे, अर्जुन समद 36वे, सुशील दोडराय 51वे, जोबे भेंग्रा 56वे, असित कुल्लु 59वे मिनिट) वि.वि. भिलवाडा हॉकी ऍकॅडमी 0. मध्यंतर 1-0

ड गट  एसएनबीपी ऍकॅडमी 2 (अक्षय यादव 54वे, शुभम लाहोरिया 60वे मिनिट) वि.वि. कमांडर नंदी सिंग हॉकी ऍकॅडमी 1 (सिगिन मुमडू 58वे मिनिट). मध्यंतर 0-0

आजचे सामने
-ड गट सेल हॉकी ऍकॅडमी वि. हॉकी शिंदेवाडी 8 वा.
अ भिलवाडा हॉकी ऍकॅडमी वि. एमपी हॉकी ऍकॅडमी 9 वा.
ग एसएनबीपी स्कूल वि. एसजीपीसी अमृतसर 11 वा.
फ गट  सालुते हॉकी ऍकॅडमी वि. नागपूर हॉकी ऍकॅडमी दु. 12.45 वा.
ह मुंबई स्कूल स्पोर्टस असोशिएशन वि. हॉकी कूर्ग 2.30 वा.
ब गट  कमांडर नंदी सिंग हॉकी ऍकॅडमी वि. ओटीएचएल इलेव्हन, दिल्ली, दु. 4 वा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.