Winter Session Maharashtra Assembly: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबर रोजी मुंबईत

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 14 आणि 15 डिसेंबर रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोनच दिवसाचे अधिवेशन होत आहे. कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन येथे आज (गुरुवारी) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत दोनदिवसीय अधिवेशन घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री ॲड.अनिल परब, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, दिलीप वळसे-पाटील, सुभाष देसाई, अनिल देशमुख, सतेज पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह विधानपरिषद आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.