Women empowerment rally : महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज : आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतीक मंत्रालय, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या अर्थसहाय्यातून (Women empowerment rally) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, शासकीय विभागीय ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

रॅलीचे उद्घाटन उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्या हस्ते झाले. रॅलीला सारस बाग येथून प्रारंभ झाला. रॅली पुरम चौक मार्गे बाजीराव रोड, नातुबाग चौक, शनिपार चौक, आप्पा बळवंत चौक मार्गे शासकीय विभागीय ग्रंथालय येथे रॅलीची सांगता झाली. (Women empowerment rally) यावेळी लेखिका माधवी कुंटे, सहाय्यक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, ग्रंथपाल सुरेश रिद्दीवाडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले उपस्थित होते.

Pune RTO : चारचाकीं वाहनांसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

प्रास्ताविक रिद्दीवाडे यांनी केले. रॅलीमध्ये सेंट हिल्डाज मुलींची शाळा, जिजामाता मुलींची शाळा, नूतन मुलींची शाळा, ठाकरसी कन्या प्रशाला, सुंदराबाई राठी मुलींच्या शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.