Women’s Cricket : मिताली राज ठरली 10 हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तर, जगभरात ती दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला एकदिवसीय मालिका सुरू असून त्यात मितालीनं हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्सनं याआधी 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. 10, 273 धावांनंतर एडवर्ड्स निवृत्त झाली. पण मिताली अजूनही खेळत आहे. दोनशेहून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. त्याशिवाय, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 6,938 धावांचा विक्रम तिच्या नावावर आहे.

मितालीनं 10 हजार धावा पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत 310 सामने खेळले आहेत. त्यापैकी 10 कसोटी, 211 एकदिवसीय सामने तर तब्बल 82 T20 सामन्यांचा समावेश आहे. 1999 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. जवळपास 22 वर्षांहून अधिक काळ मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.