Pimpri : वायसीएम रुग्णालय बनले ढेकणांचे माहेरघर

तातडीने उपाययोजना करण्याची लोक जनशक्ती पक्षाची मागणी

एमपीसी न्यूज – शहरातील गोरगरीब जनतेसाठी वरदान ठरलेले वायसीएम रुग्णालय आजमितीस ढेकणांचे माहेरघर बनले आहे. वायसीएम रुग्णालयात अनेक व्याधींनी ग्रस्त रुग्ण आहेत. त्यांना हे ढेकूण चावून परेशान करत आहे. याची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी लोक जनशक्ती पार्टीतर्फे करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन नसीम शेख यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले आहे. 

निवेदनात म्हटल्याप्रमाणे “या ढेकणांमुळे अनेक गंभीर आजार उद्‌भवत आहेत याला जवाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज लाखो रुपये वायसीएम वर खर्च केला जातो. रुग्णालयात आयसीयूमधील रुग्णांना उपचार मिळत नाहीत. वेळेवर गोळया व औषधे मिळत नाहीत, अपुर्‍या प्रमाणात औषध पुरवठा होत आहे. गंभीर स्वरुपाच्या आजारांवरची औषधे देखील उपलब्ध नाहीत”,तरी आयुक्तांनी त्वरीत या बाबींची दखल घ्यावी व कारवाई करावी, अशी विनंती नसीम शेख यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.